Akshaya Tritiya : सिमेंटच्या जंगलात, खापर आले अंगणात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2019 11:31 AM2019-05-07T11:31:57+5:302019-05-07T11:37:09+5:30
जळगाव - आज अक्षय तृतीया अर्थात आखाजीचा सण. खेडोपाडी घरोघरी खापराच्या पुरणपोळ्या अन् आमरसाचे जेवण हा पुर्वपार बेत ठरलेलाच. ...
जळगाव - आज अक्षय तृतीया अर्थात आखाजीचा सण. खेडोपाडी घरोघरी खापराच्या पुरणपोळ्या अन् आमरसाचे जेवण हा पुर्वपार बेत ठरलेलाच. पूर्वी धाब्याच्या घरात मातीच्या चुली खापर ठेवण्यासाठी हमखास असतं. आता जमाना बदलला आहे. खेड्यातही सिमेंटची घरे उभी राहिली अन् धूर होईल व घरे काळे होतील म्हणुन चूल हद्दपार झाली. काही ठिकाणी जुन्या-नव्याचा संगम घालीत बाहेर व अंगणात मोकळ्या जागी चूल आली. आता ही पुरणपोळी अंगणातील खापरावर आकार घेऊ लागली. खेडगाव ता. भडगाव येथील एका अंगणात चार घरच्या महिला आणि आजीबाई एकत्र येत सुरू असलेला हा खानदेशी खापराच्या पोळींचा [पुरणपोळी] सोहळा. फोटो - संजय हिरे, खेडगाव ता.भडगाव, व्हिडीओ - सचिन पाटील.