जळगाव (मुक्ताईनगर) - बहीण भावाच्या नातेसंबंधाला दृढ करणाऱ्या भाऊबीजेच्या दिवसाला श्री संत मुक्ताबाईला माऊली संत ज्ञानेश्वरांकडून आलेली साडी नेसविण्यात आली. बहीण मुक्ताईला ज्ञानदादाने साडी-चोळी भेट देऊन संत परंपरेतील भाऊबीजेचा उत्सव शुक्रवारी पहाटे श्री संत मुक्ताई मंदिर येथे पार पडला.