जळगाव, दि. 28 - वन्यजीव संरक्षण संस्था व वन विभागाकडून जागतिक व्याघ्र दिनानिमित्त शुक्रवारी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयापासून टायगर रॅली काढण्यात आली. जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखविली. जिल्ह्यात वाघांचा अधिवास असलेल्या भागांमधून 'टायगर रॅली' काढण्यात आली आहे. या रॅलीव्दारे चारठाणा, डोलारखेडा वनविभाग परिसरातील गावांमध्ये जावून नागरिकांमध्ये वाघांची भिती दूर करून, वाघ बचावाची भावना निर्माण व्हावी याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.