जळगाव : खान्देशी वांग्याचे भरीत जगप्रसिद्ध करण्यासाठी महाराष्ट्राचे सुप्रसिध्द शेफ विष्णू मनोहर यांनी २१ डिसेंबर रोजी जळगावातील सागर पार्क मैदानावर मराठी प्रतिष्ठानच्या सहकार्याने २५०० किलो भरीत बनविण्याचा विश्वविक्रमला सुरुवात केली आहे. सकाळी ५.३० वाजता वांगे भाजण्यास सुरुवात झाली. विश्वविक्रमाची नोंद गिनीज बुक आॅफ वर्ल्डमध्ये करण्यात येणार आहे.