नाशिक - माकड गावात किंवा शहरात येणे नवीन नाही; मात्र त्र्यंबकेश्वरपासून दहा किलोमीटरवर असलेल्या वेळुंजे गावात पाहुणी आलेल्या माकडीणीचा स्वभाव जरा अजबच आहे. माकडीणीला चक्क गावातील मांजरीच्या पिल्लाचा लळा लागला असून, माकड-मांजरीचे अनोखे प्रेम पहिल्यांदाच बघून गावकरी अवाक् झाले आहे; मात्र या माकडीणीचे महिलांशी मोठे वैर असल्याचे चित्र गावात पहावयास मिळते. यामुळे येथील महिलांनी या ‘पाहुणी’चा चांगलाच धसका घेतला आहे.(व्हिडिओ : अझहर शेख)