Next

अक्षय्य तृतीयेला कोल्हापूरच्या अंबाबाईची झोपाळ्यातील पूजा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2018 09:31 PM2018-04-18T21:31:01+5:302018-04-18T21:32:25+5:30

कोल्हापूर - वर्षातील साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त असलेल्या अक्षय्यतृतीयेचा उत्साह मुहूर्ताच्या खरेदीने द्विगुणित करीत कोल्हापूरकरांनी  सणाचा आनंद लुटला. सोने-चांदीसह ...

कोल्हापूर - वर्षातील साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त असलेल्या अक्षय्यतृतीयेचा उत्साह मुहूर्ताच्या खरेदीने द्विगुणित करीत कोल्हापूरकरांनी  सणाचा आनंद लुटला. सोने-चांदीसह अलंकारांची खरेदी, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, दारात नवी कोरी दुचाकी, चारचाकी यांसह विविध वस्तू व साहित्याच्या खरेदी-विक्रीने बाजारपेठेला उभारी मिळाली. दुसरीकडे कोल्हापूरच्या श्री अंबाबाईची  झोपाळ्यातील आकर्षक पूजा बांधण्यात आली. घरोघरी पुरणपोळीसारख्या पक्वान्नांचा घमघमाट होता.नववर्षातील गुढीपाडव्यानंतर आलेली अक्षय्यतृतीया म्हणजे कुटुंबातील सुख, समृद्धी, भरभराटीचा कधीही क्षय न होवो, अशी कामना करणारा दिवस. यानिमित्त करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची गरुडमंडपात झोपाळ्यातील पूजा बांधण्यात आली. वर्षातून एकदा देवीची ही पूजा बांधली जाते;