अष्टमीला कोल्हापूरची अंबाबाई महिषासुरमर्दिनीच्या रूपात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2018 06:58 PM2018-10-17T18:58:25+5:302018-10-17T18:58:34+5:30
कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवात अष्टमीला (बुधवारी) करवीरनिवासिनी कोल्हापूरच्या श्री अंबाबाईची महिषासुरमर्दिनी रूपात पूजा बांधण्यात आली. तंत्रात ही तिथी ‘महारात्री’ ...
कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवात अष्टमीला (बुधवारी) करवीरनिवासिनी कोल्हापूरच्या श्री अंबाबाईची महिषासुरमर्दिनी रूपात पूजा बांधण्यात आली. तंत्रात ही तिथी ‘महारात्री’ म्हणून ओळखली जाते. सात दिवसांच्या घनघोर युद्धानंतर अष्टमीला अंबाबाईने विराट रूप धारण करून महिषासुराचा वध केल्याने या दिवशी ही पूजा बांधली जाते.