Bharat Bandh : कोल्हापूरात इंधन दरवाढीविरोधात अनोखं आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2018 13:37 IST2018-09-10T13:36:07+5:302018-09-10T13:37:56+5:30
कोल्हापूर - पेट्रोल, डिझेल, गॅसदरवाढ आणि महागाईच्या निषेधार्थ भाजपा सरकारविरोधात पुकारलेल्या ‘ भारत बंद’ला कोल्हापूरात संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. बिंदू चौकात ...
कोल्हापूर - पेट्रोल, डिझेल, गॅसदरवाढ आणि महागाईच्या निषेधार्थ भाजपा सरकारविरोधात पुकारलेल्या ‘ भारत बंद’ला कोल्हापूरात संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. बिंदू चौकात डाव्या लोकशाही आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सरकारच्या निषेधार्थ निदर्शने केली. यावेळी आंदोलनात चक्क उंट आणून सरकारची उंटावरचे शहाणे अशी संभावना करत आगळ्यावेगळ्या पध्दतीने निषेध केला. ऑल इंडिया स्टुडंड फेडरेशनच्या कार्यकर्त्यांनी घोषणा देत प्रतिकात्मक पध्दतीने उंटावर बसलेल्या या शहाण्यांची बिंदू चौक ते दसरा चौक मार्गावर मिरवणुक काढून आंदोलनाकडे लक्ष वेधून घेतले.