कोल्हापूर : कोल्हापूर हॉटेल मालक संघ, व्हाईट आर्मी, सी. ए. असोसिएशन या संघटनांनी एकत्रित येवून धैर्यप्रसाद हॉल येथे सुरु केलेले ‘सेंट्रल किचन’ हे कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मोठा आधार ठरत आहे. आठ दिवसांपासून रोज सुमारे २० हजार पूरग्रस्तांना जेवण, तसेच दहा दिवस पुरेल इतक्या मेणबत्ती, काडीपेटीपासून आटा, तेल अशा विविध जीवनाआवश्यक वस्तू पुरविण्यात येत आहे. (संतोष मिठारी)