Next

उन्हाच्या कडाक्यामुळे राधानगरी अभयारण्यातील गव्यांचा कळप पाणवठ्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2018 04:42 PM2018-04-13T16:42:25+5:302018-04-13T16:42:37+5:30

उन्हाच्या तल्खीमुळे राधानगरी अभयारण्यातील वन्यजीव विभागाच्या कार्यालयासमोरील पाणवठ्यावर गव्यांचा कळप पाणी पिण्यासाठी रोज हजेरी लावत आहे. दोन दिवसापूर्वीच या ...

उन्हाच्या तल्खीमुळे राधानगरी अभयारण्यातील वन्यजीव विभागाच्या कार्यालयासमोरील पाणवठ्यावर गव्यांचा कळप पाणी पिण्यासाठी रोज हजेरी लावत आहे. दोन दिवसापूर्वीच या पाणवठ्यावर आलेल्या या गव्यांच्या कळपाचे चित्रिकरण येथील वन्यजीव रक्षक सुशांत राऊत यांनी केलं आहे. राधानगरी वन्यजीव विभागाच्या कार्यालयासमोर प्राण्यांसाठी कृत्रिम पाणवठा तयार करण्यात आला आहे.