कोल्हापूर - निलेवाडी (ता. हातकणंगले) गावातील १७६५ पैकी १७३० नागरिकांची वारणा नदीच्या महापुरातून सुखरूप सुटका केली.उर्वरित ३५ जण जनावरांच्या देखभालीसाठी थांबले आहेत.रविवार पासून निलेवाडीचा संपर्क तुटला असून सोमवार पासून पुरात अडकलेल्या नागरिकांना बोटीच्या सहाय्याने बाहेर काढण्यात जिल्हा प्रशासन व्यस्त आहे.