कोल्हा पूर - मागील काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या पावसामुळे शहरात आणि जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक नद्यांना पूर आल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. तर पंचगंगा नदीतील पाण्याच्या पातळीत वाढ होऊन शिरोलीनजीक पुणे -बंगळुरु महामार्गावर पाणी साचलं आहे. किणी टोलनाक्याजवळ ही वाहतूक बंद करण्यात आल्याने पुणे -बंगळुरु महामार्ग ठप्प झाला आहे.