कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सावाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या पूरातन अलंकारांची व सोन्याच्या पालखीची स्वच्छता करण्यात आली. यानिमित्ताने वर्षातून एकदा देवीच्या अलंकारांना नवी झळाळी मिळते. देवीच्या अलंकारांमध्ये नित्यालंकार : ठुशी, बोरमाळ, मोहराची माळ, सोळा पदरी चंद्रहार, म्हाळूंग, मोर, कुंडल, नथ, जडावाचे अलंकार : किरीट, कुंडल, लप्पा, पेंड, सातपदरी कंठी, चार पदरी कंठी, कृष्ण लॉकेट, मंगळसुत्र, चंद्रकोर लॉकेट, कोल्हापुरी साज, बोरमाळ, मोहनमाळ. उत्सवमूर्तीचे अलंकार : किरीट, कुंडल, ठुशी, बोरमाळ, चाफेकळीची माळ, पुतळ्याची माळ, लाल मण्यांची कंठी, छत्र अशा शिवकालीन,आदिलशाही कालीन व शाहु कालीन पुरातन, मौल्यवान दागिन्यांचा समावेश आहे.