कोल्हापुरात बुधवारी (8 नोव्हेंबर) जेएनयूतील विद्यार्थी कन्हैया कुमारची सभा आयोजित करण्यात आली आहे. मात्र त्याच्या सभेपूर्वी सभागृहाबाहेर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळालं. कन्हैयानं देव, देश आणि भारतीय सैन्याविरोधात बोलून नये, अन्यथा कोल्हापुरातून बाहेर सोडणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला.