टाळ्याला जीभ चिकटणे अशी म्हण आहे. मात्र, शिरोळ तालुक्यातील एका तरुणाने चक्क नाकाला जीभ लावण्याचा अनोखा प्रयोग केल्याचे ऐकून आपली जीभ टाळ्याला चिकटल्याशिवाय राहणार नाही. टाकळीवाडीच्या ३१ वर्षीय नामदेव निर्मळे यांनी नाकाला तब्बल १४७ वेळा जीभ लावून याआधीचा विक्रम मोडला आहे. वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत नामदेव यांच्या साडेचार वर्षाच्या मुलीनेही हा प्रयोग केला आहे. नामदेव यांच्या या विक्रमाची नोंद गिनिज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होत आहे