कोल्हापूर : परदेशातील थंड वातावरणात तत्काळ समरस होऊन दर्जेदार कामगिरी देशासाठी पदक जिंकण्याची कामगिरी व्हावी, यासाठी चक्क आंतरराष्ट्रीय महिला कुस्तीगीर रेश्मा माने हिच्या (वडणगे, जि. कोल्हापूर ) येथील घराशेजारीच त्या पद्धतीची वातानुकूलित तालीम बांधण्यात आली आहे. यासह क्युबाचा आॅलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकाविणारा कुस्तीगीर याँड्रो क्युनटाना हाही याच तालमीत तिला प्रशिक्षण देणार आहे.