एक राखी सीमेवरील जवानांसाठी, विद्यार्थिनींनी जवानांना पाठवल्या राख्या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2018 07:31 PM2018-08-21T19:31:06+5:302018-08-21T19:31:55+5:30
२१ ऑगस्ट २०१८ रोजी प्रायव्हेट हायस्कूल प्रशालेतर्फे गेली ५ वर्षे हा उपक्रम राबवला जातो. प्रशालेतील इ.५ ते इ.१०वी च्या तसेच एन्.सी.सी. च्या मुलींनी राखी तयार करण्याच्या स्पर्धेत भाग घेतला.
कोल्हापूर - २१ ऑगस्ट २०१८ रोजी प्रायव्हेट हायस्कूल प्रशालेतर्फे गेली ५ वर्षे हा उपक्रम राबवला जातो. प्रशालेतील इ.५ ते इ.१०वी च्या तसेच एन्.सी.सी. च्या मुलींनी राखी तयार करण्याच्या स्पर्धेत भाग घेतला. तयार झालेल्या राख्या पोस्टामार्फत सीमेवरील जवानांना पाठविण्यात आल्या. या उपक्रमात ३०० मुली सहभागी होवून साडेपाचशे राख्या तयार करण्यात आल्या. सदर उपक्रमास संस्थेचे कार्यवाह . बी.जी.देशपांडे, मुख्याध्यापिका एस्.एस्.तारे, उपमुख्याध्यापक बी.बी.पाटील, पर्यवेक्षक एम्.आर्.गोरे , एम्.ए.चवरे , पी.एस्.जाधव, .डी.सी.पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.