Next

वारांगना सखींनी बांधला सामाजिक ऋणानुबंधाचा धागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2017 06:51 PM2017-08-08T18:51:23+5:302017-08-08T18:51:30+5:30

कोल्हापूर : येथील वारांगना सखींनी सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाºया कार्यकर्त्यांना राखी बांधून अनोख्या पद्धतीने मंगळवारी रक्षाबंधन साजरा केले. या उपक्रमातून त्यांनी राखी पौर्णिमेला सामाजिक ऋणानुबंधाची झालर जोडली.

ठळक मुद्दे अनोखे रक्षाबंधन; सामाजिक कार्यकर्त्यांचा सहभाग

कोल्हापूर : येथील वारांगना सखींनी सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाºया कार्यकर्त्यांना राखी बांधून अनोख्या पद्धतीने मंगळवारी रक्षाबंधन साजरा केले. या उपक्रमातून त्यांनी राखी पौर्णिमेला सामाजिक ऋणानुबंधाची झालर जोडली.घरापासून दूर असलेल्या किंवा भाऊ नसलेल्या वारांगनांसाठी गेल्या आठ वर्षांपासून वारांगना सखी संघटनेतर्फे राखी पौर्णिमेनिमित्त साजरी केली जात आहे. लक्ष्मीपुरी येथील या संघटनेच्या कार्यालयात मंगळवारी दुपारी रक्षाबंधनाचा कार्यक्रम झाला. यामध्ये संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष किशोर घाटगे, उमेश निरंकारी, जनता संघर्ष दलाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष संतोष कांबळे, मुबारक शेख, समीर विजापुरे, राजाभाऊ वायंदडे, पैगंबर मुजावर आदींना वारांगना सखींनी राखी बांधली.यावेळी घाटगे म्हणाले, वारांगना हा समाजातील उपेक्षित घटक आहे. त्यांच्याकडे समाज दुर्लक्षित नजरेने बघतो. मात्र, रक्षाबंधनाच्या निमित्ताने आम्ही आणि समाजातील युवा संघटनेच्यावतीने त्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल. भावाच्या नात्याने त्यांच्या समस्या निवारण्याचा आमचा प्रयत्न राहील. निरंकारी म्हणाले, विविध शासकीय योजना त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याचे आम्ही काम करू. या कार्यक्रमास जयश्री मोरे, सुनीता बंडगर, आयेशा कालू, मंगल गोसावी, सुनीता खंडागळे, आशा शीख, संजय कांबळे, संजय घुले, आयूब सुतार, सोनाली यादव, अफझल बारसकर, आदी उपस्थित होते.सामाजिक घटक म्हणून पाहावेवारांगना या समाजाच्या उपयुक्त घटक आहेत. या घटकामुळे समाजातील स्त्रिया सुरक्षित राहतात. यासाठी समाजाने वारांगनांकडे एक सामाजिक घटक म्हणून पाहावे, अशी प्रतिक्रिया वारांगना सखी संघटनेच्या अध्यक्षा शारदा यादव यांनी व्यक्त केली. सामाजिक कार्यकर्त्यांनी रक्षाबंधनाच्या उपक्रमात सहभागी होऊन बंधुत्वाचे नाते जपल्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले.काही वारांगना सखींना गावी जाता येत नाही किंवा काहींना भाऊ नाहीत. राखीपौर्णिमे दिवशी या वारांगना आपल्या भावाच्या आठवणीने व्याकूळ होतात. अशावेळी त्यांना भावनिक आधार मिळावा. या उद्देशाने संघटनेतर्फे सामाजिक भावनेतून राखी पौर्णिमा साजरी केली जात आहे. त्यामध्ये सामाजिक कार्यकर्ते, पोलीस, पत्रकार बांधव आदींना वारांगना सखींकडून राखी बांधली जाते.- संजय कांबळे,प्रकल्प समन्वयक, वारांगना सखी संघटना