कोल्हापूर - जोतिबा-केर्ली या मुख्य मार्गावरील रस्त्यावर भेगा पडल्या असून बाजूला पुर्णपणे खचत निघाला आहे. गायमुख वळण रस्त्यावर असणाऱ्या भीमाशंकर मंदिर जवळ रस्त्याच्या मध्ये भली मोठी भेग पडली असून बाजूपट्टी पुर्णपणे खचली आहे. मुख्य मार्ग असल्याने जोतिबा डोंगरावरील वहातुक थांबण्यात आली आहे.