Next

१५ पैकी १५ जागा, २०२२ मध्ये पंकजा मुंडेंचा पहिला विजय | Beed Jilha Bank Election | Pankaja Munde

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2022 05:26 PM2022-01-05T17:26:36+5:302022-01-05T17:26:53+5:30

बीडमध्ये निवडणूक कोणतीही असो त्यात कोणत्या मुंडेंचा विजय होतो आणि कोणाचा पराभव याकडेच सर्वांचं लक्ष लागलेलं असतं. राज्यात जिल्हा बँकांच्या निवडणुका सुरु असताना बीडमध्ये मात्र पंकजा मुंडेंनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत बहिष्कार टाकला होता. ऐनवेळी उमेदवारांचे अर्ज बाद केल्याने पंकजा मुंडेंनी राज्यपालांकडे त्यांची तक्रार केली होती. मात्र त्यानंतर काही जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने बहिष्कार टाकला. त्यामुळे भाजपच्या ताब्यात असलेली बीडची जिल्हा बँक महाविकास आघाडीच्या ताब्यात गेली. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंनी त्यावेळी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपही केले होते. आता बीडमध्ये आणखी एका बँकेची निवडणूक झाली. या निवडणुकीत मात्र पंकजा मुंडेंनी बाजी मारत सर्वच्या सर्व १५ जागांवर विजय मिळवलाय. स्वतः पंकजा मुंडे या निवडणुकीत बिनविरोध निवडून आल्या आहेत...