Next

जालन्यातील मारहाण प्रकरणात ५ पोलिसांचं निलंबन | 5 Police Beats to BJP Councillor | Maharashtra News

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2021 15:53 IST2021-05-29T15:52:59+5:302021-05-29T15:53:28+5:30

जालन्यातील एका खासगी रूग्णालयात झालेल्या वादाची व्हिडिओ शुटिंग काढण्याच्या कारणावरून भाजप युवा मोर्चाच्या सरचिटणीसाला पोलिसांनी बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.... हा व्हिडीओ ९ एप्रिल २०२१ रोजी घडलेल्या घटनेचा आहे.... यात पदाधिकारी गयावया करत माफी मागत आहे तर पोलिस त्याला काठ्या तुटेपर्यंत मारहाण करत असल्याचं दिसतंय... भाजपा नेत्यांच्या मागणीनंतर संबंधित पोलिसांवर कारवाई करण्यात आलीये... याप्रकरणी, पोलीस उपनिरीक्षकासह 5 पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलंय...