Next

पीएमपीच्या ठेकेदारांना 99 कोटी, ड्रायव्हर-कंडक्टर मात्र उपाशीपोटी? PMPML Lockdown Fund | Pune News

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2022 06:10 PM2022-01-13T18:10:06+5:302022-01-13T18:10:24+5:30

Pune : भारतात सुरवातीला कोरोनाचा प्रसार झपाट्याने होऊ लागल्याने संपूर्ण भारतात अचानक लॉकडाउन लागू करण्यात आला होता..त्यानंतर सर्व काही जागच्या जागी थांबलं.. विमान, रेल्वे, बस यासारखी वाहतुकीची साधनं महिनोन्महिने बंद होती.. हॉटेल, दुकान बंद असल्यामुळे अनेकांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले.. लॉकडाऊन हटवल्यानंतर यातील काही जण सावरले तर अनेकांना अजूनही सावरणे कठीण जात आहे.. असं असलं तरीही यातील अनेकांना शासकीय मदत काही मिळाली नाही.. पुण्यात मात्र याला अपवाद ठरणारा प्रकार घडलाय..लॉकडाऊन काळात ज्या ठेकेदारांच्या बस जागेवरच उभ्या राहिल्या त्यांना नुकसान भरपाई म्हणून तब्बल 99 कोटी रुपये देण्याचा निर्णय पीएमपीच्या संचालक मंडळाने घेतला.. नेमका काय आहे हा प्रकार पाहूयात या स्पेशल रिपोर्टच्या माध्यमातून...

टॅग्स :पुणेPune