ED, CBI नंतर आता Anil Deshmukh Income Tax च्या रडारवर | Income Tax Raid | Maharashtra News
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2021 01:28 PM2021-09-21T13:28:23+5:302021-09-21T13:28:35+5:30
ईडीच्या ससेमिऱ्यात अडकलेल्या अनिल देशमुखांवर आता इनकम टॅक्स विभागानं एक वेगळाच आरोप केलाय. अनिल देशमुखांनी १७ कोटी रुपयांचं उत्पन्न दडवल्याचं आरोप प्राप्तीकर विभागानं केलाय. १७ सप्टेंबरला माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या नागपुरातल्या घरावर छापे पडले होते. इतकंच नाही तर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या संस्थांवर छापे टाकण्यात आले होते. या कारवाईदरम्यान काही महत्त्वाची कागदपत्रं सापडल्याचा दावा इनकम टॅक्स विभागाकडून करण्यात आला होता.