Next

गेम झाला, आणखी एक नेता उत्पल पर्रिकरांच्या बाजूने, टेन्शन वाढलं | Utpal Parrikar | Devendra Fadnavis

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2022 04:18 PM2022-01-25T16:18:25+5:302022-01-25T16:18:48+5:30

पणजीतली लढाई दिवसेंदिवस भाजपसाठी कठीण होत चाललेय... भाजपचे गोव्यातील निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी पणजीत बाबूश मॉन्सेरात यांनाच तिकीट दिलं... आणि ज्याची भीती होती तेच घडलं... गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे दिवंगत नेते मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकर यांनी थेट पक्ष सोडला.. बंडखोरी केली.. इतकंच नाही, तर अपक्ष म्हणून उमेदावारीही दाखल केली... तेव्हा भाजपसह राजकीय जाणकारांनाही वाटलं की, उत्पलला राजकीय पार्श्वभूमी नाही... त्यात काँग्रेसमधून भाजपत आलेल्या धूर्त आणि मुरब्बी बाबूश मॉन्सेरात यांच्या सारख्या राजकारण्यासमोर त्याचा टिकाव लागणार नाही... उत्पल दुसरी एखादी ऑफर स्वीकारून मैदान सोडेल, अथवा निवडणुकीआधीच त्याला पराभव दिसेल.. पण तसं होताना दिसत नाहीये.. उलट आता भाजप, देवेंद्र फडणवीस आणि पणजीतले भाजपचे उमेदावर बाबूश मॉन्सेरात यांच्याच अडचणी वाढताना दिसताय... त्यातच आता पणजीच्या माजी महापौरांनीही बाबूश मॉन्सेरात विरोधात शड्डू ठोकलाय... आणि सगळ्या पक्षांच्या ऑफर नाकारून, थेट उत्पलला पाठिंबा जाहीर केलाय... त्यामुळे नेमकं काय होणार? या विषयी बोलू.. त्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघा...