'पंजाबमधील घटनेमागे अमित शाह यांचा तर हात नाही ना?' काँग्रेसचा सवाल | Amit Shah | Modi in Punjab
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2022 07:05 PM2022-01-07T19:05:55+5:302022-01-07T19:14:15+5:30
मुख्यमंत्र्यांना थँक्यू सांगा. मी भठिंडा विमानतळावर जिवंत परतू शकलो... असं पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंजाबमधील घटनेनंतर तेथील अधिकाऱ्यांना म्हणाले.. असं बोललं जातंय.. त्यामुळे पंतप्रधान मोदींच्या जीवाला धोका होता का? असे प्रश्न उपस्थित केले जातायत. पंजाबमध्ये पंतप्रधानांचा ताफा अडवल्यामुळे त्यांना यु टर्न घ्यावा लागला. त्यानंतर जोरदार राजकारण रंगलंय. काँग्रेसचं सरकार तिथे असल्याने सरकार भाजपकडून सरकारवर टीका होतेय.. तर काँग्रेसकडूनही त्याला उत्तर दिलं जातंय.. आता काँग्रेस मोठा प्रश्न उपस्थित करत या घटनेमागे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा हात तर नाही ना, अशी शंका उपस्थित केलीय. काँग्रेसचे प्रदेशाक्ष्यक्ष नाना पटोलेंनी हा प्रश्न उपस्थित करत ही नौटंकी असल्याचं म्हटलंय.. पाहा काय म्हणाले नाना पटोले...