फडणवीसांची भेट अन् साखर कारखानदारांसाठी Amit shah सरसावले, पुढचं टार्गेट जिल्हा बँका? Amit shah
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2022 07:45 PM2022-01-07T19:45:35+5:302022-01-07T19:48:06+5:30
Amit shah केंद्रीय गृहमंत्री आहेत पण ते देशाचे पहिले सहकारमंत्रीही आहेत. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच केंद्रीय सहकार मंत्रालय तयार झालं, आता अमित शहांनी सहकारात लक्ष घालायला सुरुवात केलीय. अमित शहांनी साखर उद्योगासाठी आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय घेतलाय, १९८५ पासून न सुटलेला प्रश्न सोडवलाय. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी अमित शहांची भेट घेतली आणि या भेटीनंतर तात्काळ अमित शहांनी ३७ वर्षातला प्रश्न निकाली काढला. जिल्हा बँकेच्य नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये नारायण राणे, पंकजा मुंडेंच्या कामगिरीचं अमित शहांनी नुकतंच कौतुक केलं आणि काही दिवसातच साखर उद्योगासाठी क्रांतिकारक निर्णय घेतला. अमित शहा आता आपला मोर्चा सहकार क्षेत्राकडे वळवताय का, साखर कारखान्यांसाठी अमित शहांनी नेमका काय निर्णय़ घेतलाय, आधी साखर उद्योग, मग जिल्हा बँका, मग दूध संघ अशी अमित शहांची क्रोनोलॉजी असणार आहे का, देवेंद्र फडणवीसांची या निर्णय़ात काय भूमिका होती..