Next

Anil Parab यांचा दावा, Kirit Somaiya यांना समन्स | वेळ उलटी फिरतेय? Mumbai High Court | Maharashtra

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2021 14:15 IST2021-10-02T14:15:37+5:302021-10-02T14:15:53+5:30

महाविकास आघाडीच्या अनेक मंत्र्यांविरोधात सोमय्यांनी ईडी-सीबीआयकडे तक्रार दाखल केली, त्यांच्या तक्रारीनुसार अनेक नेत्यांना समन्स बजावण्यात आले. पण आता वेळ उलटी फिरायला लागलीय असं म्हणता येईल कारण किरीट सोमय्यांनाच आता समन्स बजावण्यात आलेत. परिवहनमंत्री अनिल परब यांच्या दाव्याची दखल घेत कोर्टानं किरीट सोमय्यांना फटकारलंय. अनिल परब यांच्या मानहानीप्रकरणी किरीट सोमय्यांना समन्स बजावण्यात आलंय. 23 डिसेंबरपर्यंत कोर्टात हजर राहण्याचे सोमय्यांना आदेश देण्यात आलेत. अनिल परबांनी सोमय्यांविरोधात 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केलाय.