Next

Anil Parab यांचा बंगला, Ramdas Kadam यांची रसद अन् नवा गौप्यस्फोट! पाहा काय घडलं! Kirit Somaiya

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2021 02:12 PM2021-12-21T14:12:04+5:302021-12-21T14:12:36+5:30

रामदास कदमांनी अनिल परब यांच्याविरोधात Kirit Somaiya सोमय्यांना रसद पुरवली. असा गंभीर आरोप झाला आणि त्यानंतर रामदास कदम शिवसेनेतून साईडट्रॅक व्हायला लागले. त्यांना विधानपरिषदेचं तिकीट नाकारण्यात आलं, कधीही झाली नाही अशी घोषणाबाजी दसरा मेळाव्यात खुद्द रामदास कदम यांच्याविरोधात शिवसैनिकांनी केली, कदम यांच्या अंगणातल्या नगरपंचायत निवडणुकीची जबाबदारी त्यांच्या विरोधकाला दिली गेली. इतकंच काय तर खुद्द उद्धव ठाकरेंच्या बॅडलिस्टमध्ये कदम गेले. आता इतकं सारं रामायण ज्या आरोपामुळे झालं तोच आरोप बिनबुडाचा, फुसका असल्याचं समोर येतंय.