Next

नितेश राणे यांना आणखी एक धक्का, अडचणी वाढणार? | Nitesh Rane | Narayan Rane | Nilesh Rane

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2022 02:41 PM2022-02-02T14:41:47+5:302022-02-02T14:42:24+5:30

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि मोदी सरकारमधील केंद्रीय मंत्री Narayan Rane यांचे पुत्र नितेश यांच्या डोक्यावर असलेली अटकेची टांगती तलवार अदयापही कायम आहे... त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेज राणेंनी मिळवलेला विजय अद्यापही त्यांना साजरा करता आलेला नाही... कारण शिवसैनिक Santosh Parab हल्ला प्रकरण काही राणेंची पाठ सोडत नाहीये... आधी सत्र न्यायालयात राणेंना धक्का बसला... मग मुंबई उच्च न्यायालयात.. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा नितेश यांना अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला.. नितेश यांना अटकेपासून संरक्षण मिळालं खरं.. पण अद्यापही पूर्णपणे दिलासा मिळालेला नाही.. अशातच आता नितेश यांना आणखी एक धक्का बसलाय.... आणखी एका कोर्टाने नितेश यांच्या अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळलाय.. त्यामुळे आधीच डोक्यावर अटकेची टांगती तलवार असलेल्या नितेश यांच्या अडचणी वाढल्याचं बोललं जातंय.. आणि त्याच अनुषंगाने नितेश यांना अटक होणार का? ही चर्चा सुद्धा जोरात सुरु झालेय...