Next

रजनीश सेठ यांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती | Maharashtra new DGP Rajnish Seth

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 10:59 PM2022-02-18T22:59:00+5:302022-02-18T22:59:58+5:30

रजनीश सेठ १९८८ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. आझाद मैदान दंगलीच्या वेळी रजनीश सेठ हे मुंबईचे कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे सहपोलिस आयुक्त होते. रजनीश सेठ हे फोर्स वन महाराष्ट्राचे प्रमुख राहिलेले आहेत. गृह विभागाचे प्रधान सचिव म्हणूनही सेठ यांनी जबाबदारी सांभाळलेली आहे. रजनीश सेठ यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एसीबी) महासंचालक होते. संजय पांडे यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त कार्यभार होता. यावरून न्यायालयानेही सरकारवर ताशेरे ओढले होते. अखेर सरकारकडून रजनीश सेठ यांची पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे...