Next

आर्यनला ताब्यात घेतलं, सेल्फी काढला... नंतर तो गायब झाला Aryan Khan Viral Audio clip of Kiran Gosavi

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2021 19:47 IST2021-10-27T19:44:34+5:302021-10-27T19:47:15+5:30

आर्यन खानला ज्या व्यक्तीने पकडलं, हाताला धरुन एनसीबी कार्यालयात नेलं विशेष म्हणजे त्याने आर्यन खानसोबत सेल्फी काढला. तो फोटो बाहेर आल्यानंतर हा व्यक्ती कोण अशीच चर्चा झाली. आणि अखेर हा व्यक्ती के.पी.गोसावी असून तो या प्रकरणातील साक्षीदार असल्याचं सांगण्यात आलं. आता हा व्यक्ती कुठेय हे कोणालाच माहिती नाही. त्यानंतर के.पी.गोसावी हा व्यक्ती गायब झाला. त्याचं शेवटचं लोकेशन आगरतळा असल्याचं बोललं गेलं. त्यानंतर तो व्यक्ती स्वतः माध्यमांशी बोलला. आपल्या जीवाला धोका असल्याचं किरण गोसावी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. आपण महाराष्ट्रात सरेंडर होणार नाही असंदेखील किरण गोसावी म्हणाले होते. त्यानंतर किरण गोसावी उत्तर प्रदेशात लपल्याची माहिती समोर आलीय.. तसेच त्यांनी उत्तर प्रदेश पोलिसात सरेंडर होण्याचा प्रयत्नही केला. मात्र तेथील पोलिसांनी सरेंडर करण्यास नकार दिलाय.. त्या संभाषणची एक ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होतेय..