भाजपनं बाजू भक्कम केली, ते 12 आमदार लवकरच विधानभवनात दिसणार? BJP Suspended MLA in Vidhan Bhavan
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2022 02:38 PM2022-02-02T14:38:48+5:302022-02-02T14:39:11+5:30
भाजपच्या १२ आमदारांच्या निलंबनाची कायदेशीर लढाई काही संपताना दिसत नाहीये. कारण सुप्रीम कोर्टानं भाजपच्या १२ आमदारांचं निलंबन रद्द केलं असलं तरी ठाकरे सरकार या १२ आमदारांना विधानभवनात प्रवेश द्यायला तयार नाही. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर चर्चा करु असा स्टँडच ठाकरे सरकारनं घेतलाय. या १२ आमदारांच्या निलंबनावरुन ठाकरे सरकार कायदेशीर लढाई लढणार आहे मग आता भाजपनंही कायदेशीर प्रतिवार करायची तयारी केलीय. भाजपनं थेट विधानभवन सचिवांना पत्र दिलंय, या पत्रामुळे भाजपनं आपली कायदेशीर बाजू भक्कम केलीय. या पत्रात नेमकं काय म्हटलंय, या पत्राचा नेमका भाजपला फायदा काय होईल, भाजपची बाजू भक्कम झालीय असं आम्ही काय म्हणतोय हे आपल्याला पाहचंय पण त्याआधी पाहुयात की ठाकरे सरकारनं सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर काय भूमिका घेतलीय ते. ठाकरे सरकारचे डॅशिंग आमदार भास्कर जाधवांनी रोखठोक भूमिका घेतलीय, १२ आमदारांचं निलंबन झालं होतं तेव्हा भास्कर जाधवच विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीवर होते. सुप्रीम कोर्टाच्या निकालावर भास्कर जाधव म्हणतायत की...