भाजपा नेत्याचं 'स्टिंग ऑपरेशन', प्रभाकर साईलनं पैशांसाठी केले वानखेडेंवर खोटे आरोप? Sting Operation
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2021 20:39 IST2021-10-26T20:38:16+5:302021-10-26T20:39:30+5:30
आर्यन खान ड्रग्ज प्रकरण आणि एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावरील आरोपांमुळे महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं आहे. अमली पदार्थ संबंधी हे प्रकरण आहे, शाहरुख खानच्या मुलावर यात कारवाई झाली. इतकंच सुरुवातीला हा प्रकरणाविषयी बोललं जात होतं. पण नंतर अनेक खुलासे होत गेले आणि या प्रकरणातील गुंतागुंतही वाढत गेली. आता या प्रकरणात एक धक्कादायक व्हिडीओ समोर आलाय... भाजपा नेते मोहित कंबोज यांनी एक नवा व्हिडिओ ट्विट करत आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात खळबळजनक दावा केलाय. त्यांनी तो व्हिडीओ ट्विट केलाय.. त्या व्हिडीओत काय आहे. ते आधी पाहा...