Next

BJP की NCP, दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून नंबर एकचा दावा|Sharad Pawar,Devendra Fadnavis |Maharashtra

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 03:50 PM2022-01-20T15:50:50+5:302022-01-20T15:51:18+5:30

नुकतीच महाराष्ट्रात जवळपास १७ जिल्हांमध्ये १०६ नगरपंचायतीची निवडणूक पार पडली. यात स्थानिक स्तरावर आघाड्या करुन निवडणूक लढवली गेली. काही ठिकाणी महाविकास आघाडीतील पक्षच एकमेकांच्या विरोधात उभे होते. तर काही ठिकाणी त्यांचा भाजपविरोधात सामना झाला. या १०६ नगरपंचायतींपैकी भाजपने २४ नगरपंचायतींमध्ये बहुमत मिळवलंय तर राष्ट्रवादी काँग्रेसने २६ ठिकाणी बहुमत मिळवलं आहे.. मात्र जागांचा विचार केला तर मात्र भाजप पुढे असल्याचा दावा भाजप नेत्यांनी केलाय.. तसेच फडणवीसांनी तर भाजप आणि सहयोगी मिळून ३० नगरपंचायतींवर सत्ता स्थापन करणार असल्याचं म्हटलंय.. त्यामुळे राज्यात नक्की कोणता पक्ष एक नंबरचा ठरलाय. त्यावरुन चर्चा सुरु झाल्या आहेत..पाहुयात दोन्ही पक्षातील नेत्यांनी काय दावे केलेत.