Next

18 वर्षांवरील नागरिकांना लसीकरण नाही | Corona Vaccination | Covid 19 | Maharashtra News

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2021 11:12 AM2021-04-29T11:12:08+5:302021-04-29T11:12:26+5:30

१८ वर्षावरील नागरिकांना लस देण्याची घोषणा केल्यानंतर अनेक जण लस घेण्यासाठी उत्सुक झाले होते. नोंदणीला सुरुवातही झालीय. आता महाराष्ट्रातील नागरिकांना कोरोनावरील लस मोफत देण्याचा निर्णय ठाकरे सरकारनं घेतलाय. गेल्या काही दिवसांपासून मोफत लसीकरणाचा मुद्दा चर्चेत होता. तशी मागणी सर्वच स्तरातून केली जात होती. अखेर आज झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत याबद्दलचा निर्णय घेण्यात आला. १८ ते ४४ वर्ष वयोगटात असलेल्या ५ कोटी ७१ लाख नागरिकांचं मोफत लसीकरण करण्यात येणार आहे. मात्र या वयोगटाला १ मेपासून कोरोना लस मिळणार नसल्याची माहिती आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपेंनी दिली.