काँग्रेस की भाजप... कोणाचा दावा खरा? Empty chairs in Narendra Modi Punjab Rally
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2022 05:49 PM2022-01-07T17:49:21+5:302022-01-07T17:56:44+5:30
PM Modi's rally was cancelled due to empty chairs, not security breach: Congress hits back at BJP पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत आतापर्यंत कधी न घडलेला प्रकार घडलाय. पंतप्रधान हे देशातील सर्वात महत्वाचे व्यक्ती मानले जातात. देशातील सर्वात कडक सुरक्षा ही पंतप्रधानांना दिली जाते. त्यामुळे पंतप्रधान येणार म्हटल्यावर देशात कुठेही त्यांच्या सुरक्षेची योग्य ती काळजी घेतली जाते. पण पंजाबमध्ये मात्र वेगळंच घडलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफा काही लोकांनी अडवला. त्यानंतर पंतप्रधान मोदींसह त्यांची सुरक्षा यंत्रणा १५-२० मिनिटे केवळ बघ्याच्या भुमिकेत वाट पाहत होते की कधी रस्ता मोकळा होतो. पण रस्ता काही मोकळा झाला नाही. आणि अखेर पंतप्रधान मोदींना युटर्न घेऊन परत मागे जावं लागलं.. पंजाबमध्ये नेमकं काय घडलं मोदींसोबत आणि तिथे सत्तेत असलेल्या काँग्रेसने यावर काय दावा केला.. हे आपण या व्हिडीओतून जाणून घेऊया...