Coronaरुग्णसंख्या घटली पण मृत्यू वाढले,Corona पुन्हा मृत्यूचं तांडव करणार ? Corona Dealths Rising
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 10:41 PM2022-01-31T22:41:57+5:302022-01-31T22:43:02+5:30
आठवड्याभरापासून ओमायक्रॉनचा प्रभाव कमी झालाय, कोरोना रुग्णांची संख्या घटतेय. पण तरीही एक चिंता वाढवणारी बातमी म्हणजे देशात कोरोना मृत्यूची संख्या अचानक वाढू लागलीय. म्हणजे १ जानेवारीला जिथे सरासरी ३०० मृत्यू कोरोनामुळे देशभरात होत होते तिथेच आता मृत्यूची संख्या दिवसाला ९०० च्या वर गेलीय. एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या तर घटतेय पण मृत्यू कमालीचे वाढतायत याचं कारण काय असा प्रश्न आरोग्य यंत्रणेसमोर आहे. अचानक मृत्यू का वाढतायत, हा आणखी नवीन व्हेरिएंट तर नाही, हॉस्पिटल्समध्ये पुरेसे बेड आहेत, आरोग्य सुविधा आहेत तरी मग इतके मृत्यू का होऊ लागलेत?