Next

कोरोनाची लस देईन या २० आजारांपासून संरक्षण | Corona Vaccine will protect against these 20 diseases

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2022 02:44 PM2022-02-01T14:44:40+5:302022-02-01T14:44:58+5:30

मागील दोन वर्षांपासून जगभरात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. आता जगभरात कोरोनासोबतच ओमायक्रॉननेही चिंता वाढवली आहे. हा कोरोना आल्यापासून लोक इतर आजारांनाही घाबरत आहेत. पण, आता जागतिक आरोग्य संघटनेने एक मोठी माहिती दिली आहे. जगभरात कोरोनाविरोधात लसीकरण सुरू आहे. पण, आता ही कोरोना लस कोरोनासोबतच इतर 20 आजारांवर उपयुक्त असल्याची माहिती डब्लूएचओने दिली आहे. जगभरात करोनाने लाखो लोकांचे जीव घेतले. अनेकांचे आयुष्य उद्धवस्त झाले. पण, हा कोरोना लसीकरणामुमुळे नियंत्रणात येताना दिसत आहे. कोरोना लस हेच सध्या या आजारावरील परिणामकारक शस्त्र असल्याचे मत जाणकारांचे आहे. यातच आता कोरोना लसीमुळे फक्त कोरोनाच नाही, तर इतर 20 आजारांपासून संरक्षण मिळते, अशी माहिती दिली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना लस घेतल्यामुळे संरक्षण मिळणाऱ्या 20 पेक्षा अधिक आजारांची यादीच जाहीर केली आहे. पाहूयात ते आजार नेमके कोणते...