Next

६ महिन्यात तिसऱ्या राणेंवर गुन्हा, Rane टप्प्यात आले की Thackeray 'करेक्ट कार्यक्रम' कसा करतात?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2022 04:22 PM2022-02-04T16:22:22+5:302022-02-04T16:22:50+5:30

नारायण राणे-उद्धव ठाकरे हे फक्त राजकीय शत्रू नाहीत. त्यांचं शत्रुत्व हे राजकीय नाही, वैयक्तिक झालंय हे उभा महाराष्ट्र जाणतो. राणे शब्द ऐकला तरी शिवसैनिक खवळतात आणि ठाकरे शब्द ऐकला की राणे खवळतात. पण तुम्हाला माहितीये गेल्या सहा महिन्यांचा विचार केला तर तीन वेळा ठाकरेंनी राणेंचा करेक्ट कार्यक्रम केलाय. राणे टप्प्यात आले की ठाकरेंनी करेक्ट कार्यक्रमाची हॅटट्रीक केलीय...म्हणजे समोर शिवसेना आहे आणि राणे पितापुत्र कोणत्या ना कोणत्या कायद्याच्या कचाट्यात सापडलेत असं सहा महिन्यात सलग तीनदा घडलंय. त्यामुळेच ठाकरे विरुद्ध राणे वादात आता स्कोअर हा तीन शून्य झालाय अशी चर्चा सुरु झालीय. राणे टप्प्यात आले की ठाकरे कार्यक्रम करतात असं आम्ही का म्हणतोय, ठाकरेंनी राणेंचा फक्त सहा महिन्यात तीनदा कार्यक्रम कसा केला, मुख्यमंत्री झाल्यावर ठाकरे राणेंवर भारी पडतायंत का, राणे पलटवार का करत नाहीयेत, राणे आता मवाळ झालेत का यावरच बोलुयात पुढच्या तीन मिनिटात, सुरुवात करुयात फक्त सहा महिन्यात मुख्यमंत्री ठाकरे राणेंवर कसे भारी पडले ते...