Next

दादराचा हादरा...शिवसेनेसाठी दादरातील विजय महत्त्वाचा का आहे? | Shivsena will become National Party

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2021 15:06 IST2021-11-05T15:06:11+5:302021-11-05T15:06:41+5:30

शिवसेनेच्या कलाबेन डेलकर 45 हजार मतांच्या फरकाने विजयी झाल्या. भाजपच्या महेश गावितांना कलाबेन डेलकर यांनी हरवलं. महाराष्ट्राच्या बाहेरून निवडून येणाऱ्या कलाबेन डेलकर या शिवसेनेच्या पहिल्या खासदार ठरल्यात. आता डेलकर यांचं निवडून येणं शिवसेनेसाठी दिवाळी गिफ्ट ठरणार आहे. कारण राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळण्यासाठी जे निकष असतात, त्या निकषांच्या जवळ दादरातल्या विजयामुळे शिवसेना पोहचलीय. राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळण्यासाठी काय निकष असतात, दादरातल्या विजयामुळे शिवसेना या निकषांच्या जवळ का पोहचलीय, राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली तर त्याचे काय फायदे असतात या साऱ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला जाणून घ्यायचीयत पुढच्या तीन मिनिटात तेव्हा रिपोर्ट शेवटपर्यंत पाहा..