ओमायक्रॉनचा धोका, दिवसाला 'इतके' लोक संक्रमित होणार? Omicron acquired a mutation from cold virus
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2021 03:08 PM2021-12-07T15:08:50+5:302021-12-07T15:09:07+5:30
Omicron variant may have picked up a piece of common-cold virus लॉकडाऊनमधून हळूहळू लोकं बाहेर पडू लागले. कोरोना लसीकरणानं या आजाराला नियंत्रणात आणलं. पुन्हा एकदा सर्व देशातील जनजीवन पुर्वपदावर येत होते. मात्र कोरोनाच्या नवनव्या व्हेरिएंटमुळे अनेक देशांची चिंता वाढवली आहे. सर्वकाही सुरळीत होत असताना दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या ओमायक्रॉन व्हेरिएंटनं भारताला सतर्क केलंय. कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटपेक्षा ओमायक्रॉन व्हेरिएंट अधिक वेगाने संक्रमित होत असून दक्षिण आफ्रिकेतील वाढणाऱ्या रुग्णसंख्येच्या आकडेवारीने लोकांमध्ये दहशत पसरली आहे. आता कोरोना व्हायरसच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे.