डोंगरावर गर्द झाडी, डोंगराखालून गाड्यांची वर्दळ | Delhi-Mumbai expressway Tunnel through Matheran
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2021 02:39 PM2021-12-21T14:39:57+5:302021-12-21T14:40:14+5:30
World's longest expressway between Delhi and Mumbai | Delhi-Mumbai expressway | Tunnel through Matheran - Eco-Sensitive Zone | Delhi Mumbai Expressway Route Map | माथेरान... निसर्गाची खाण... मुंबईचा शेजार आणि पर्यटकांचा बाजार... तापणाऱ्या मुंबईशेजारचं थंड हवेचं हक्काचं आणि जवळचं पर्यटनस्थळ... डोक्याला हिरव्यागार वनराईचा फेटा... कमरेला वाऱ्याच्या मंद झुळुकीचं उपरणं आणि वाऱ्याच्या शिळीतून निसर्गाचा अभंग गाणारा किर्तनकार उभा राहावा, तसं माथेरान शेकडो वर्षांपासून उभं आहे... म्हणूनच, ती पर्यटकांची पंढरी बनून गेलीय... माथेरान म्हटलं की अनेकांना आठवते मिनी ट्रेन, गर्द झाडी, घोड्यांच्या टापाचे आवाज... आणि अंगाला झोंबणाऱ्या थंडीचा आल्हाद... वाऱ्याची झुळूक आणि डोंगरावरून दिसणारी इवली इवली घरं... गाड्या आणि शेत-शिवारं... मज्जाच मज्जा... पण मंडळी पर्यटकांचं माहेरघर असणारं माथेरान आता देशाच्या राजधानीला जोडणारं महत्त्वाचं ठिकाण... कारण अनेक दिवसांपासून चर्चेत असणारा दिल्ली ते उरण जेएनपीटी महामार्ग जाणारेय माथेरानमधून... तोही टक्क भल्या-मोठ्या अवाढव्य डोंगराखालून... त्यासाठी माथेरानच्या डोंगरात भलामोठा बोगदाही खणण्यात येणारेय... पाहूयात देशाच्या राजधानीला जोडणारा हा महामार्ग आणि बोगदा नेमका कसा असणारेय...