Next

मोदींशी सरकार स्थापनेवर चर्चा झाली होती पण... पवारांचा आजवरचा सर्वात मोठा गौप्यस्फोट Sharad Pawar

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2021 05:32 PM2021-12-30T17:32:13+5:302021-12-30T17:32:35+5:30

२०१९ची विधानसभा निवडणूक, त्यानंतर रंगलेलं सत्तानाट्य, फडणवीस-ठाकरे-शिवसेना-भाजपत आलेली कटुता, पहाटेचा शपथविधी या साऱ्याची चर्चा आजही रंगते. २०१९च्या विधानसभा सेना-भाजप युतीत लढले पण निकालानंतर मुख्यमंत्रीपदावरुन दोघांचा काडीमोड झाला. आता हा काडीमोडी माझ्याच एका विधानामुळे झाला असा गौप्यस्फोट शरद पवारांनी केलाय. इतकच नाही तर त्याकाळात पडद्यामागे नेमकं काय घडलं, कसं घडलं, पवारांनी त्यात काय खेळी हेही शरद पवारांनी स्पष्टपणे बोलून दाखवलंय. पहाटेच्या शपथविधीवर तर पवारांनी आजवरचा सर्वात मोठा गौप्यस्फोट केलाय. अजित पवारांना फडणवीसांसोबत पवारांनीच पाठवलं होतं का, पवारांचं असं कोणतं विधान शिवसेना-भाजपतली कटुता वाढायचं कारण ठरलं, पवार त्याच काळात दिल्लीत जाऊन मोदींना का भेटले होते.. पाहुयात सविस्तरपणे पण सर्वात आधी बघुयात पवारांचं कोणतं विधान सेना-भाजपतली कटुता वाढायला कारण ठरलं ते मग बघुयात अजित पवारांना फडणवीसांसोबत पाठवण्यावर पवार नेमकं काय म्हणाले ते...