Next

तिथे 'योगी' नकोच, भाजपने घेतला मोठा निर्णय | Yogi Adityanath | Uttar Pradesh Assembly elections |

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2022 02:22 PM2022-01-17T14:22:00+5:302022-01-17T14:22:23+5:30

Up Election 2022 Yogi Adityanath योगी आदित्यनाथ हे नाव गेल्या पाच वर्षांपासून देशभरात घेतलं जातं. उत्तर प्रदेश मुख्यमंत्री झाल्यानंतर देशभरात योगींना ओळखलं जाऊ लागलं. आता उत्तर प्रदेशात निवडणूक होत असताना योगी पुन्हा मुख्यमंत्री होणार का? या चर्चा सुरु झाल्यात. एकीकडे भाजपला गळती सुरु असताना आता भाजपने योगींबाबत एक मोठा निर्णय घेतलाय. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपल्या १०७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध केली. यामध्ये भाजपाने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना गोरखपूर शहर मतदारसंघातून उमेदवारी घोषित केलीय. योगी आदित्यनाथ हे विधानसभेची निवडणूक श्रीरामाची जन्मभूमी असलेली अयोध्या किंवा श्रीकृष्णाची जन्मभूमी असलेल्या मथुरेमधून लढवतील, अशी चर्चा होती. मात्र अखेरीस गुरू गोरखनाथांची भूमी असलेल्या गोरखपूरमधून ते निवडणूक लढवतील, यावर शिक्कामोर्तब करण्यात आलाय...