'व्हॅलेंटाईन डे'ला Rajeev Satav यांच्या आठवणीत Dr Pradnya Satav यांचं भावूक ट्वीट; Valentine Day
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2022 22:39 IST2022-02-14T22:38:30+5:302022-02-14T22:39:02+5:30
काँग्रेसचे राज्यसभा खासदार डॉ. राजीव सातव यांचं मे महिन्यात निधन झालं. राजीव सातव यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी डॉ. प्रज्ञा सातव या खंबीरपणे त्यांचा राजकीय वारसा चालवत आहेत. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी प्रज्ञा सातव राजीव सातवांच्या आठवणीत भावूक झाल्या. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली, एक खूप भावूक ट्विट डॉ. प्रज्ञा सातव यांनी केलं. सातव यांनी केलेल्या ट्विटवर अनेकांनी भावूक प्रतिक्रिया दिल्यात. प्रज्ञा यांनी राजीव यांच्यासोबतचा एक फोटोही शेअर केलाय. माझं तुमच्यावर कालही प्रेम होतं, आजही आहे आणि कायम राहिल असं भावनिक ट्विट इंग्रजीतून प्रज्ञा यांनी केलंय..