शेलार तमाशातील वेशात, सेना स्टाईल बॅनरमुळे वाद चिघळला, पाहा काय घडलं? Ashish Shelar
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2021 02:11 PM2021-12-14T14:11:41+5:302021-12-14T14:12:11+5:30
मुंबईच्या महापौर Kishori pednekar यांच्याबद्दल भाजप नेते Ashish Shelar यांनी एक विधान केलं, हे विधान अवमान करणारं होतं, असा आरोप करत पेडणेकर यांनी शेलारांविरोधात लैंगिक छळाची तक्रार दाखल केली. त्यानंतर शेलारांविरोधात गुन्हाही दाखल झाला. गुन्हा दाखल झाला असला तरी शिवसेना मात्र शेलारांवर टीका करण्याची संधी सोडत नाहीये. आता शिवसेनेनं आशिष शेलार यांची खिल्ली उडवणारं बॅनर लावलंय. विशेष म्हणजे हे बॅनर थेट मुंबईत नरीमन पाँईट इथल्या भाजप प्रदेश कार्यालयासमोरच लावण्यात आलं होतं. या बॅनरवर आशिष शेलार यांचा एक फोटो असून त्याखाली आशिष शेलार यांची खिल्ली उडवणारी टीकाही करण्यात आली.