धडक कारवाईने ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त | NCB Raids Shops in Nanded | Sameer Wankhede | Maharashtra
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2021 04:30 PM2021-11-24T16:30:19+5:302021-11-24T16:30:39+5:30
आर्यन खान अटकेनंतर एनसीबी मुंबईचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे चांगलेच चर्चेत आले. आधी आर्यन प्रकरणात धडक कारवाई केली म्हणून आणि नंतर नवाब मलिकांच्या आरोपांनी. मलिकांच्या गौप्यस्फोटांनंतर वानखेडे थोडे दिवस शांत झाले होते, पण आता आर्यन प्रकरण थंड होतंय, वानखेडे पुन्हा सक्रिय झालेत. वानखेडेंच्या नेतृत्वात एनसीबी मुंबईनं नांदेडमध्ये धडक कारवाई करत ड्रग्जचा कारखानाच उद्ध्वस्त केलाय. नांदेडच्या कामठा परिसरात ही कारवाई करण्यात आलीय. सुमारे 111 किलो ड्रग्ज बनवण्यासाठीचं केमिकल ओपीएम पॉपी जप्त करण्यात आलंय