राजू केंद्रे... बुलडाण्याच्या पिंप्रि खंदारे या छोट्याशा गावात राहतो... भटक्या समाजातून येतो... आई वडिलांचं तर प्राथमिक शिक्षणही झालेलं नाही... आई-वडील शेती करतात... राजू शिकला म्हणून केंद्रे कुटुंबात कुणीतरी उच्च शिक्षण घेतलं असं म्हणायला वाव मिळाला.. पण या शिक्षणाच्या जोरावर या शेतकऱ्याच्या पोराने जे काही केलंय.. ते अनेकांना त्याला आज सलाम करायला भाग पाडतंय.. फोर्ब्सने खेड्यातल्या शेतकऱ्याच्या पोराची दखल घेतली.. आणि त्याची चर्चा झाली खरी.. पण फोर्ब्सने त्याची दखल का घेतली... यापेक्षाही ती दखल घेण्याआधी त्याने जो संघर्ष केला.. तो जाणून घेणं महत्त्वाचं आहे.. कारण राजूने या बॅनरवर आदरणीय राजूभाऊ केंद्रे होण्यापूर्वी ज्या खस्ता खाल्ल्यात त्यातूनच त्याच्या शेतकरी आई-बापाच्या चेहऱ्यावर हा आनंद आलाय...