'घरघर' संपेना, आता नारायण राणेंच्या पत्नीला नोटीस...काय होतंय? Notices Against Narayan Rane's Wife
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 11:01 PM2022-02-18T23:01:31+5:302022-02-18T23:02:00+5:30
नारायण राणे आपल्या जुहू चौपाटीवरच्या बंगल्यामुळे अडचणीत आलेत. राणेंच्या जुहू चौपाटीवरच्या बंगल्याला मुंबई महापालिकेनं नोटीस धाडलीय, या बंगल्याचा काही भाग अनधिकृत आहे असा साक्षात्कार अचानक मुंबई महापालिकेला झालाय. आता याच सर्वात नारायण राणेंच्या पत्नीलाही नोटीस बजावण्यात आलीय. इतकच काय तर नोटीसमध्ये निलेश राणेंचंही नाव आहे. आतापर्यंत नारायण राणे, नितेश राणे, निलेश राणे अडचणीत येताना आपण पाहिलंय पण पहिल्यांदाच नारायण राणेंच्या पत्नीचं नाव वादात सापडलंय. नेमकं प्रकरण काय आहे, कोणती नोटीस आहे ही, नारायण राणेंच्या पत्नीला नोटीस का बजावण्यात आलीय, निलेश राणेंचंही नाव नोटीसमध्ये का आलंय, यावरच बोलुयात पुढच्या तीन मिनिटात पण सगळ्यात आधी बघुयात की हे नोटीसचं नेमकं प्रकरण काय आहे.