Next

Sameer Wankhede कडून चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन; बाहेर पडताना 'या' कारणामुळे नवा वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2021 14:37 IST2021-12-07T14:37:13+5:302021-12-07T14:37:42+5:30

Sameer Wankhede मुस्लिम आहेत पण त्यांनी अनुसूचित जातीचं खोटं सर्टिफिकेट मिळवून नोकरी मिळवली असा आरोप नवाब मलिकांनी केला. त्यानंतर घडलेलं महाभारत सगळ्यांनाच माहितीय. याच आरोपांच्या धुरळ्यात समीर वानखेडे चैत्यभूमीवर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी दाखल झाले. पण वानखेडे दाखल होणार ही चाहुल लागताच तिथं असलेल्या भीमशक्ती रिपब्लिकन सेनेनं वानखेडेंविरोधात जोरदार घोषणाबाजी केली, त्याचदरम्यान वानखेडेंच्या समर्थनार्थही घोषणा लागू लागल्या. त्यामुळे काही काळासाठी वातावरणात तणाव आला होता. पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. काय झालं चैत्यभूमीवर नेमकं पाहुयात..